Contact Us at +91 89751 74977

तूर पिकात धोक्याची घंटा!

तूर पिकात स्टेम ब्लाईट / रॉट रोग नियंत्रण

⚠️ स्टेम ब्लाईट / स्टेम रॉट रोगाचा प्रादुर्भाव

🕵️‍♂️ रोगाची लक्षणे – ओळख कशी कराल?

  • 🌿 खोडाच्या तळाशी तपकिरी ठिपके दिसतात
  • 🌿 फांद्या हळूहळू काळ्या पडतात
  • 🌿 वरची पानं पिवळी होऊन गळतात
  • 🌿 झाडाची वाढ थांबते
  • 🌿 अखेरीस झाड वाळून मरते 😟

🌧️ रोग वाढण्याची कारणे

  • ☔ सततचा आणि जास्त पाऊस
  • 💦 जमिनीत जास्त ओलावा
  • 🌫️ जास्त आर्द्र हवामान

✅ शेतकरी मित्रांनो, उपाय तुमच्याच हातात!

🌿 जैविक उपाय

  • ✔️ Trichoderma viridi – २ ते ३ लिटर/एकर आळवणी

💊 रासायनिक उपाय

👉 आळवणी :

  • Copper oxychloride – ३०० ग्रॅम/एकर
  • Metalaxyl + Mancozeb – ३०० ग्रॅम/एकर

👉 फवारणी :

  • Copper oxychloride – ३० ग्रॅम/पंप
  • Metalaxyl + Mancozeb – ३०–३५ ग्रॅम/पंप
  • Chlorothalonil + Metalaxyl – २५ मिली/पंप

⚠️ फवारणी करताना खोड + फांद्या + पानं पूर्ण झाकली गेली पाहिजेत!

🌿 झाडांची वाढ चांगली ठेवण्यासाठी

  • 👉 पानांवर पूरक खतांची फवारणी करा :
  • १९:१९:१९
  • किंवा १२:६१:००

💪 ही खतं झाडाला नवीन जोम व ऊर्जा देतील!

🔔 शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा

  • ✅ रोगाची सुरुवात होताच उपाय करा
  • ✅ उशीर = मोठं नुकसान
  • ✅ वेळेत संरक्षण = भरघोस उत्पादन 🌾

✍️ बालाजी देशमुख – सहायक कृषी अधिकारी, ता. कळंब (मंगरूळ), जि. धाराशिव

1 thought on “तूर पिकात धोक्याची घंटा!

  1. Pingback: - Bhoomi Expert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Cart

Your Cart is Empty

Back To Shop